1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी

हरबर्‍याची भाजी आणि भाकरी

हरबर्याची भाजी आणि भाकरी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
MHNEWS











साहित्य : हरबर्‍याच्याची भाजी, दाळीचे पीठ, तेल, मोहरी, जिरे, लसणाच्या पाकळ्या, वाळलेली मिरची, हिंग, हळद, बेसन, तिखट, मीठ, पाणी.

कृती : सर्वप्रथम एक मोठी कढई घ्या. चुलीवर/गॅसवर ठेवा. त्यात तीन मोठे चमचे तेल टाका. तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे टाका, फोडणीचा कडकडाट झाला की त्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून टाका. (लसूण अगदी बारीक कुटायचा नाही.) वाळलेली मिरची टाका, चवीला चिमूटभर हिंग आणि हळद टाका. लसूण थोडा परतला की कढईत दोन ते तीन ग्लास पाणी टाका.

आता त्या पाण्याला उकळी आली की दोन वाटी हरबर्‍याची भाजी घेऊन त्यात पाऊण वाटी हरबर्‍याच्या दाळीचे पीठ मिसळा. नंतर थोडे तिखट, मीठ, जास्त तिखट हवे असल्यास थोडा काळा मसाला टाका. हे सगळे एकत्र मिसळून घ्या. तोपर्यंत कढईतल्या पाण्याला छान उकळी आलेली असेल.

आता त्या पाण्यात थोडे थोडे करीत मिसळलेली भाजी टाका. एका हाताने भाजी टाकायची आणि दुसर्‍या हाताने कढईत ती हलवत रहायची. भाजी चांगली गरम झाली की काढून ठेवा. (ती घट्ट होऊ देऊ नये. पातळ भाजी खायला येणारी मजा पातळ रश्यापेक्षा जास्त चांगली असते.) या गरम भाजीवर मस्त लसणाची फोडणी टाकायची आणि तीळ लावलेल्या गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत खा.
- महान्यूज
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा