गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (15:03 IST)

Women's Day: स्तनांमध्ये वेदना होणे, हे कारण असू शकतं, स्वत:ची काळजी घ्या

सिस्ट 
अनेकदा सामान्य सिस्टमुळे देखील वेदना जाणवते. नेहमी हे सिस्ट कार्सिनोजेनिक नसून अनेकदा फ्लुइडने भरलेले असतात. मासिक पाळी दरम्यान सिस्ट फुलून जाता आणि अधिक वेदना होते. कधी-कधी हे दोन्ही ब्रेस्टमध्ये तर कधी एकाच स्तनात वेदना जाणवतात.
 
ब्रेस्ट इंफेक्शन 
बर्‍याच वेळा घाम ग्रंथी अर्थात ग्लँड बंद होणे, मिल्क डक्ट किंवा धमनी अवरोधित झाल्यामुळे किंवा इंग्रोन हेअर या कारणामुळे ब्रेस्टमध्ये इंफेक्शनचा धोका वाढतो. ज्यामुळे निप्पलहून पस, ब्लड, लाल किंवा हिरव्‍या रंगाचं द्रव्य डिस्चार्ज होतं.
 
टैटू 
स्तनाजवळ टैटू काढण्याची फॅशन असली तरी यात वापरण्यात येणारी शाईमध्ये विषारी घटक असतात ज्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. कधी-कधी यामुळे एचआयव्ही, हेपाटाइटिस बी आणि सी संक्रमणाचा धोका देखील वाढतो.
 
ब्रेस्ट इंगोर्जमेंट 
या मुळे मुलांना दूध पाजणे कठिण जातं. म्हणून अतिरिक्त दूध काढून द्यावं, नाहीतर ब्रेस्टमध्ये सूज येऊ शकते किंवा स्तन कडक होऊ शकतात. अशा परिस्थितीत स्तनांना स्पर्श केल्याने वेदना जाणवतात.
 
पैपीलोमा 
आपल्या निप्पलमधून रक्त निघत असल्यास पैपीलोमा अवस्था असू शकते. हे दुग्ध नलिका अधिक वाढीस कारणीभूत ठरतात. 
 
अशा कुठल्याही परिस्थितीत डॉक्टरांकडे जायला उशिर करणे योग्य नाही विशेष करुन ब्रेस्टमधून ब्लड डिस्चार्ज होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.