कसूरी मेथीचे इतके फायदे, बायकांसाठी तर वरदान
कसूरी मेथी अन्नाची चव आणि सुवास वाढवते. याचे सेवन केल्यानं बायकांच्या आरोग्यास खूप फायदे मिळतात हे जाणून घेतल्यावर आपल्याला मिळालेले हे वरदानच वाटेल. चला तर मग जाणून घेऊ या बायकांना कसूरी मेथीचे सेवन केल्याने काय फायदे मिळतात.
1 कसूरी मेथी रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. ही मधुमेह आणि टाईप 2 च्या मधुमेहा पासून बचाव करण्यात देखील उपयोगी आहे, म्हणून कसूरी मेथीचे सेवन करा आणि साखरेची पातळी नियंत्रित ठेवा.
2 जन्मलेला बाळांच्या आईसाठी हे खूप फायदेशीर आहे. हे दूध वाढवतं, ज्यामुळे बाळाची भूक भागते आणि तो उपाशी राहत नाही.
3 बायकांमध्ये मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीच्या वेळी होणाऱ्या हार्मोन्सच्या बदल मध्ये देखील कसूरी मेथी फायदेशीर आहे आणि हे शरीरातील वेदनेला दूर करण्यात मदत करत.
4 कोलेस्टरॉल कमी करावयाचे असल्यास दररोज कसूरी मेथी आपल्या आहारात समाविष्ट करावी. आपण ही रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी हे पाणी अनोश्या पोटी प्यावं.
5 पोट आणि लिव्हरशी निगडित सर्व त्रासांचे निराकरण देखील कसूरी मेथी करते. गॅस अतिसार, अपचन या सारखे त्रास ह्याच्या सेवनाने दूर केले जाऊ शकतात.