गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: बुधवार, 9 डिसेंबर 2020 (10:28 IST)

गॅझेटस्‌ची साफसफाई आणि सुरक्षा

मोबाइल, टॅब, लॅपटॉप ही गॅझेटस्‌ नेहमीच्या वापरामुळे अस्वच्छ होतात. ती स्वच्छ ठेवण्यासाठी त्याची नियमित साफसफाई करायला हवी. कशी स्वच्छ ठेवाल आपली गॅझेटस्‌?
 
स्क्रीन वाईप्स : आपल्या घरातील टीव्ही, फोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरसारखी गॅझेटस्‌ वापरतो. त्याच्या स्क्रीनवर धूळ जमा होते तसेच डाग पडतात. त्यामुळे त्याच्या स्क्रीनवरील दृश्ये नीट दिसत नाहीत. त्यासाठीच या गॅझेटची वेळोवेळी साफसफाई करणे आवश्यक आहे. स्क्रीन वाईप्सचा वापर करुन गॅझेटचा स्क्रीन आपण साफ करु शकतो. साधारणपणे 500 रुपयात वाईप्सचा बॉक्स मिळतो. स्क्रीन वाईप्समध्ये एक विशिष्ट प्रकारचे फॉर्म्युलेटेड सोल्युशन असते. त्यामुळे कमी वेळात स्क्रीन चांगल्या प्रकारे साफ करता येते.
 
स्क्रीन क्लिनिंग कीट : धुळीव्यतिरिक्त आपल्या टच स्क्रीन डिव्हाइसवर आपल्या बोटांचे ठसे उमटतात तसेच लहान लहान डागांमुळे स्क्रीन खराब होते. एखाद्या कापडाने स्क्रीनपुसली तर काचेवर ओरखडे उठतात. फक्त 150 रुपयांत आपण एक स्क्रीन क्लिनिंग किट खरेदी करु शकता. त्यात मायक्रोफायबर कपड्यासह एक स्क्रीन क्लिनिंग लिक्विड असते. याचा वापर करुन सर्व प्रकारच्या स्क्रीन आपण साफ करु शकतो. या किटच्या खोक्यावर दिलेल्या सूचना योग्य प्रकारे अमलात आणल्या पाहिजेत. स्क्रीन क्लिनिंग किट प्रत्येक डिव्हाइस स्वच्छ करण्यासाठी उपयोगी पडू शकते.