शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (15:16 IST)

कोरोना व्हायरस : मास्क धुताना या गोष्टी लक्षात ठेवा

कोरोना व्हायरस टाळण्यासाठी मास्कचा वापर फार गरजेचं आहे. यासह जर आपण सूती कपड्यांने बनवलेले मास्क वापरात असाल तर फारच उत्तम, त्याचा फायदा असा आहे की आपण हे पुन्हा-पुन्हा वापरू शकता. आपल्याला फक्त ते स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. या साठी आपण आपल्या मास्कला धुऊन परत वापरण्यात घेऊ शकता.
 
आपल्या मास्क ला आपण स्वच्छ कसे करावे चला जाणून घेऊ या. 
मास्कला चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि साबणाचा वापर करू शकतो. 
 
मास्कला धुतल्या नंतर चटक उन्हात वाळवा. ते या कारण जर का गरम पाण्याने धुतल्यावर देखील त्या मधील सूक्ष्मजंतू राहिले असतील, तर ते चटक उन्हात मास्क वाळवल्यावर त्याचा नायनाट होईल. 
 
चटक उन्हात मास्क ला किमान 4 ते 5 तास वाळत ठेवा. त्यासह हे लक्षात असू द्या की जवळपास धूळ किंवा माती उडणार नाही ह्याची काळजी घ्या.
 
जर मास्कला इतक्या वेळ वाळत ठेवणे शक्य नसल्यास, मास्क धुतल्यावर किमान 10 ते 15 मिनिटे डेटॉलच्या पाण्यात पडू द्या. नंतर याला वाळवून घ्या. 
 
मास्कचा वापर करण्याचा पूर्वी आपण याला एकदा इस्त्री आवर्जून करावी. प्रेस किंवा इस्त्रीच्या उष्णते मुळे आपले मास्क निर्जंतुक होईल. या मध्ये विषाणूंचे थेंब आले असल्यास ते इतर कपड्यांमध्ये पसरू नये.