शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (12:43 IST)

काय सांगता हात धुतल्याने खरंच कोरोना पळेल... कसं काय, जाणून घ्या

सध्या सगळीकडे कोरोना ने उच्छाद मांडला आहे. लहान असो तरुण असो किंवा वयोवृद्ध असो. कोणी ही याचा दुष्प्रभावातून वाचलेले नाही. कोरोनाच्या संसर्गाला टाळण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळल्याने याचा संसर्गाला टाळता येऊ शकतं. जसे की सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे, आणि आपले हात वारंवार धुणे. हे पाळल्यास आपण याला टाळू शकतो. आज आम्ही इथे आपल्याला हात धुण्याचे महत्त्वाबद्दल सांगत आहोत. तज्ज्ञ सांगतात की वारंवार हात धुतल्याने केवळ कोरोनाच नव्हे तर बऱ्याच आजारापासून वाचता येतं. कारण आपल्याला होणारे आजार हातातून आपल्या शरीरात प्रवेश करणाऱ्या जिवाणूंपासून होतात. 
 
डॉक्टर सांगतात की हात न धुतल्यामुळे संक्रमण आणि जिवाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आजार पसरवतात. आता कोरोनाच्या विषाणूचं बघा हा आजार देखील हातातून पसरत आहे. चला तर मग जाणून घ्या हात धुण्याने होणाऱ्या फायद्यांबद्दल आणि हात धुण्यानंतर कोरोना व्यतिरिक्त कोणत्या रोगापासून संरक्षण मिळू शकतं. 
 
हात धुणे महत्त्वाचे का? 
हात धुणे एखाद्या औषधाप्रमाणे आहे. जर आपण आपले हात धुतले नाही तर व्हायरसच्या संसर्गामुळे जंतांच्या संपर्कात येऊ शकता, ज्यामुळे आपण आजारी देखील होऊ शकता आणि आपल्याला औषधोपचाराची गरज भासू शकते. पण जर का आपण आपले हात नेहमी धुवत असाल तर आपण आजारी होणार नाही आणि आपल्याला औषध घेण्याची गरज पडणार नाही. 
 
हात न धुतल्यामुळे होणारे आहार -
* कोरोना व्हायरस होणं 
* फुफ्फुसांचा आजार होणं 
* हेपेटायटिस A होणं 
* त्वचेचे आजार होणं 
* अन्नातून विषबाधा होणं 
* पोटात जंत होणं 
* हात, पाय आणि तोंडाचे आजार होणं 
 
हात कसे धुवावे - 
तज्ज्ञांच्या मते, हात स्वच्छ करण्यासाठी साबण आणि पाण्याने आपले हात किमान 20 सेकंदापर्यंत धुवावे आणि त्यानंतर आपल्या हातांना एका स्वच्छ कापड्यानं पुसून घ्यावं. या मुळे हाताने पसरणाऱ्या आजाराचा धोका काय तर आजारच होतं नाही.
 
हात धुणं कधी आवश्यक आहे ? 
* जेवण्याच्या पूर्वी आणि जेवण्याचा नंतर आपले हात साबणाने द्यावे.
* स्वच्छतागृह किंवा टॉयलेट वापरल्यानंतर हात धुणं आवश्यक आहे. 
* धूळ आणि मातीच्या ठिकाणी काम केल्यावर साबण आणि पाण्याने हात धुऊन घ्या.
* एखाद्या प्राण्याला स्पर्श केल्यावर देखील हाताला साबण पाण्याने धुऊन घेणं फार महत्त्वाचं आहे.