1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
  4. Women's Day Wishes in Marathi 2025

Women's Day Wishes in Marathi 2025 महिला दिन शुभेच्छा संदेश मराठी

Happy Women's Day Wishes in Marathi 2025
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा 
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
नारी ही शक्ती नराची,
नारीच हीच शोभा घराची,
तिला द्या आदर, प्रेम, माया
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…
 
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू 
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
ती भीत नाही म्हणून ती खंबीर नाही
तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…
 
विधात्याची निर्मिती तू, प्रयत्नांची पराकाष्ठा तू
एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
ती मुलगी आहे,
ती ताई आहे
ती पत्नी आहे
ती आई आहे
ती सून आहे
ती मैत्रिण आहे
ती जन्म आहे
ती माया आहे,
ती सुरूवात आहे
आणि तिच नसेल तर 
सारं काही व्यर्थ आहे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
हजारो फुल लागतात एक माळा बनवण्यासाठी
हजारो दीपक तेवतात एक आरती सजवण्यासाठी
हजारो थेंब साचतात एक समुद्र बनवण्यासाठी
परंतु एक स्त्रीच पुरेशी आहे घराला स्वर्ग बनवण्यासाठी
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
स्री म्हणजे वास्तव्य
स्री म्हणजे मांगल्य
स्री म्हणजे मातृत्व
स्री म्हणजे कतृत्व 
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ 
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
चौकटीतून बाहेर पडून,
दुश्मनांच्या नजरेला नजर भिडवून
उभ्या ठाकणाऱ्या रणरागिणींना
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक 
तर कधी धगधगती ज्वाळा,
म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता,
तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
तुझ्या प्रतिभेला पंख मिळू दे
तुझ्या स्वप्नांना क्षितिज मिळू दे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर 
आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या 
माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा
 
तुझ्यात तो अंश आहे, ज्यामुळे जगात सुरू वंश आहे
हे नारी.. तू खरोखर महान आहे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
पुढील लेख
Women’s Day 2025 Gifts Ideas: महिला दिनी तुमच्या जीवनातील खास वुमनला ही हृदयस्पर्शी भेटवस्तू द्या