शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By

मातृदिन निमित्त : आई

आठवते आई फिरफिरूनी
प्रसन्न शांत तुझे वदन
मूर्तिमंत जणू तृष्ण समाधान
विफल ज्यापुढे ज्ञान-विज्ञान
आई तू तुळशीपुढे बसून
काय पाहिलेस डोळे मिटून
तुझ्या पांढर्‍या केसांमधून
परतले कसे निवून

आई तू अतिकष्ट उपसले
दुःखाचे किती मूग गिळले
तेढ्या वागणुकी सहन केल्या
शब्दांचे प्रहार झेलले
कसा काय तुज परिस मिळाले
ज्याने केलेले लोखंडाचे सोने
काहीही नसता हातात कसे

पडू दिले नाही कुणास उणे

आणि तू म्हणावे देवाने दिले
सारे काही मला माझ्या वाट्याचे
सार्‍यांचे सुख खूप वाहिले
आता न मागणे काही राहिले
आई तू जीवनव्रत उजविले
कशात ना मन गुंतवून ठेवले
सर्वांचे इच्छित सारखे भले
सारख वाटून डोळे मिटले. 

- सुमित भानावत