लक्ष्मी पंचमी: चैत्र नवरात्रीत हे व्रत केल्याने लक्ष्मी लोकात मिळतं स्थान

lakshmi panchami
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला अधिष्ठाती देवी महालक्ष्मीचे पूजेचे विधान आहे. या दिवशी भक्त संपूर्ण दिवस उपास करून रात्री देवी लक्ष्मीचे विधिपूर्वक पूजन करतात.
असे म्हणतात की एके काळी देवी लक्ष्मी देवतांशी रुसली आणि क्षीर सागरात गेली. मां लक्ष्मीचे गमन झाल्यामुळे सर्व देवता श्री विहीन झाले. तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुनः: प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष विधी विधानाने त्यांच्यासाठी व्रत केले. त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी लक्ष्मीसाठी व्रत केले. देवताच नव्हे तर असुरांनी देखील देवीची उपासना केली. या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली. व्रत समाप्ती पश्चात माता पुनः: उत्पन्न झाली आणि त्यांचा विवाह श्री हरी विष्णूंसह संपन्न झाला. देवता पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले. ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते. म्हणून ही तिथी लक्ष्मी पंचमी व्रत रूपात साजरी केली जाते.

लक्ष्मी पंचमी पूजन विधी:
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला एकीकडे नवरात्री सण साजरा केला जातो तर पंचमीला लक्ष्मी पंचमी म्हणून धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पंचमी विधिपूर्वक साजरी केली जाते. या दिवशी रात्रीच्या काळात देवीची पूजा करून व्रतात दही भाताचे सेवन करण्याचे विधान आहे.

ही तिथी सात कल्पादि तिथींमधून एक मानली गेली आहे. या कारणामुळे हा दिवस सौभाग्यशाली आहे. लक्ष्मी पंचमी व्रत केल्याने देवी लक्ष्मी मनोवांछित फल प्रदान करते. भक्त धन-संपदा व समृद्धी प्राप्ती साठी देवी महालक्ष्मीचे

या प्रकारे पूजन करू शकतात.

श्री लक्ष्मी पंचमी व्रत व पूजा विधी

श्री लक्ष्मीची पूजा करण्या हेतू सर्वात आधी स्नानादिने निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवीच्या पूजेसाठी लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करणे अती उत्तम ठरेल.
नंतर सोनं, चांदी किंवा तांब्याच्या लक्ष्मीच्या मूर्तीची कमळाच्या फुलासह विधिपूर्वक पूजा करावी. मूर्ती नसल्यास प्रतिमा किंवा फोटोची पूजा करता येते.
पूजा सामुग्री या रूपात देवीला धान्य, हळद, गूळ, आलं, इतर देवीला अर्पित करावे.
सामर्थ्यानुसार हवन देखील करवू शकता.
व्रत करत असलेल्या भक्तांनी विधिपूर्वक उद्यापन देखील करावे.
श्री पंचमीला देवीचे अनेक स्तोत्र जसे कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी सुक्त याचे पाठ करावे.
हिंदू मान्‍यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचे व्रत करणार्‍या भक्तांना 21 कूल यासह देवी लक्ष्मीच्या लोकात स्थान प्राप्त होतं. स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद मिळतो. आर्थिक समस्यांना सामोरा जात असलेल्यांनी हे व्रत केल्याने त्यांच्या सर्व समस्या आपोआप सुटतात.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

या 4 बायकांनी स्वतःवर दोष घेऊन श्रीरामाला केले वंदनीय

या 4 बायकांनी स्वतःवर दोष घेऊन श्रीरामाला केले वंदनीय
काही अपवादांना वगळता प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा मोलाचा वाटा असतो. त्या मागे ...

बलराम याला संकर्षण नाव कसे पडले?

बलराम याला संकर्षण नाव कसे पडले?
भगवान श्रीकृष्णाचे थोरले बंधू बलराम यांना बलदाऊ देखील म्हणतात. कृष्ण त्यांना दाउ ...

श्रीकृष्णाला बासरी देणारे कोण होते, वाचा पौराणिक कथा

श्रीकृष्णाला बासरी देणारे कोण होते, वाचा पौराणिक कथा
द्वापर युगात ज्यावेळी श्रीकृष्ण पृथ्वी वर अवतरले, त्यांना भेटावयास सर्व देवी देवता हे वेष ...

होम हवन करताना स्वाहा का म्हणतात, जाणून घ्या यामागील गूढ

होम हवन करताना स्वाहा का म्हणतात, जाणून घ्या यामागील गूढ
हवन करताना स्वाहा का म्हटले जाते हे अनेक लोकांना ठाउक नसेल. खरं तर अग्निदेवांची पत्नी ...

रामायणात मंथरा कोण होती ?

रामायणात मंथरा कोण होती ?
वाल्मीकींच्या रामायणात मंथरा महत्त्वाची भूमिका बजावते. तिच्यामुळेच प्रभू श्रीरामांना 14 ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...