शारदीय नवरात्री विशेष पाककृती उपवासाचा डोसा
उपवासाचा डोसा ही एक साधी आणि सात्विक रेसिपी आहे, जी सणासुदीच्या काळात किंवा उपवासाच्या दिवशी बनवली जाते.
साहित्य-
साबुदाणा-एक वाटी
भगर किंवा राजगिरा पीठ-अर्धा वाटी
बटाटा
जिरे-अर्धा टीस्पून
एक-हिरवी मिरची
सैंधव मीठ
पाणी गरजेनुसार
तेल किंवा तूप
कृती-
सर्वात आधी साबुदाणा कमीतकमी पाच तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर पाणी काढून टाकून साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक दळून घ्या. दळलेला साबुदाणा एका भांड्यात काढा आणि त्यात भगर किंवा राजगिरा पीठ मिसळा. मिश्रणात हळूहळू पाणी घालून डोश्याच्या पिठासारखी पातळ सरबरी तयार करा. पिठात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.आता त्यात सैंधव मीठ, जिरे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. पिठाला दहा मिनिटे तसेच ठेवा. आता नॉन-स्टिक तवा गरम करा. तव्यावर थोडे तेल किंवा तूप लावून पिठाचा पातळ थर पसरवा. व मध्यम आचेवर डोसा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. डोसा सोनेरी रंगाचा आणि कुरकुरीत झाला पाहिजे. आता उकडलेल्या बटाट्यात सैंधव मीठ, जिरे आणि हिरवी मिरची मिसळा. डोसाच्या मधोमध हि भाजी ठेवून डोसा गुंडाळा. आता उपवासाचा डोसा गरमागरम शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व्ह करा. तसेच साबुदाण्याऐवजी फक्त राजगिरा किंवा भगरीचे पीठ वापरूनही डोसा बनवता येतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik