शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By
Last Updated : रविवार, 12 मे 2024 (10:07 IST)

मदर्स डे कोट्स Mothers Day Quotes In Marathi

आई ही एकच अशी व्यक्ती आहे 
जी इतरांपेक्षा नऊ महिने अधिक तुम्हाला ओळखत असते 
 
ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
 
आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे आनंदचा सागर
 
आयुष्यात अनेक जण येतात जातात
पण आईसारखं कधीच कोणी आयुष्यात राहात नाही
 
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते
डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते 
डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते
 
आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा
पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका
 
जगात असे एकच न्यायालय आहे, 
जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई
 
व्यापता न येणारं अस्तित्व 
आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व
 
मरणयातना सहन करूनही
आपली जीवनयात्रा सुरू करून देते ती आई
 
कुठेही न मागता भरभरून मिळेलेलं दान म्हणजे आई
 
आई असते तुमची पहिली मैत्रीण, तुमची घनिष्ठ मैत्रीण आणि कायमची एकमेव मैत्रीण
 
जेव्हा तुम्ही तुमच्या आईकडे पाहता… तेव्हा जगातील सगळ्या शुद्ध गोष्टीकडे तुम्ही पाहता
 
आईपण हे एखाद्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकते
 
फक्त आईच भविष्याचा विचार करु शकते कारण ती एका नव्या जीवनाला आयुष्यात आणत असते-
 
आईची मिठी ही इतर कशापेक्षाही अधिक आरामदायी असते
 
जे तुम्ही बोलू शकत नाही, ते न बोलता समजून घेते आई
 
आई ही अशी व्यक्ती आहे जी तुमच्या ह्रदयात सगळ्यात आधी जाऊन बसते
 
आईचे प्रेम हे कोणत्याही नव्या फुललेल्या फुलांपेक्षाही अधिक सुगंधित असते