शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वार्ता|
Last Modified: मुंबई. , सोमवार, 3 मे 2010 (14:48 IST)

एनएसजीचा एक कमांडो जखमी

ताजमध्ये आणखी दोनापेक्षा अधिक दहशतवादी

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर सगळ्या भयंकर हल्ला होऊन तब्बल 40 तास उलटले असूनही होटल ट्राइडेंट, ताज व नरीमन हाऊसमध्ये दहशतवाद्याच्या विरूध्द मिशन 'टॉप टू बॉटम' सुरू आहे. आज सकाळी एनएसजीचा एक कमांडो गंमीर जखमी झाला आहे.

दहशतवाद्याशी मुकाबला करण्यासाठी एनएसजी, नौसेना, वायुसेना यांचे संयुक्त मिशन सकाळी सात वाजेपासून सुरू झाले आहे. कमांडोंना हेलीकॉप्टरच्या माध्यमातून उचीत ठिकाणी उतरवले जात आहे.

नरीमन हाऊसमध्ये असलेल्या दहशतवाद्यांनी कमांडोंवर केलेल्या अंदाधुंदी गोळीबारात एक कमांडो जखमी झाला आहे. त्या जवानाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नरीमन हाऊसच्या आजुबाजूच्या रहीवाशांनी सांगितले की, दहशतवादी गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेलमध्ये राहत होते. चार ते पाच अशा संख्येने समुह करून ते रहात होते. दहशतवादी इतका भयंकर हल्ला करण्याच्या उद्देशाने आले आहेत याची कुणालाच कल्पना नव्हती.

हॉटेल ताजमध्ये आणखी दोन पेक्षा अधिक दहशतवादी लपले असून त्यांनी 15 ते 20 नागरीकांना बंदिस्त केले आहे.