मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 3 मे 2010 (16:19 IST)

दहशतवाद्यांचा ताज उडविण्याचा कट नव्हता- एनएसजी

मुंबईतील ताजमहल या पंचतारांकीत हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भ्याड असून त्यांचा ताज उडविण्याचा कट नव्हता. कारण, त्यांच्याकडे पुरेशा दारूगोळा नव्हता, असे खुलासा राष्‍ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) महासंचालक जे. के. दत्त यांनी केला.

ऑपरेशन सायक्लोनच्या यशस्वी झाल्यानंतर एनएसजी पथक दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर दत्त यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत संपूर्ण कारवाई, कमांडोंची कामगिरी आणि दहशतवाद्यांचे मनसुबे याबद्दल सविस्तर माहिती दिली. पाकिस्तानातील मॅरिएटप्रमाणे ताज उडवून लावण्याचा दहशतवाद्यांचा इरादा होता, या चर्चेचे त्यांनी खंडन केले.