मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|

पुन्हा विश्वास निर्माण करणार- पवार

मुंबईत झालेल्या हल्ल्यांनंतर आता नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

दहशतवादी हल्ले हे देशासाठी दुर्देवी असुन, नागरिकांच्या मनात सरकारविषयी असंतोष निर्माण झाल्याचे पवार यांनी कबूल केले. सरकारने तत्परतेने कारवाई करत दहशतवाद्यांचे मनसुबे धुळीस मिसळले असुन, आता नागरिकांच्या मनात सरकारविषयी पुन्हा विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केल्याचे ते म्हणाले.