ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण केंद्र

vaccination
Last Modified बुधवार, 12 मे 2021 (08:15 IST)
ठाण्यात विवियाना मॉलच्या वाहनतळामध्ये महापालिका प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्रावर बुधवारपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असून याठिकाणी ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या केवळ १०० ज्येष्ठांनाच कोविशिल्डची दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या लांब रांगा लागत आहेत. या रांगेत ताटकळत उभे राहून ज्येष्ठांना लस घ्यावी लागत होती. तसेच सहव्याधींमुळे काही ज्येष्ठांना रांगेत उभे राहून लस घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा नागरिकांची लसीकरणादरम्यान होणारी गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने विवियाना मॉलच्या वाहनतळामध्ये ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्रावर बुधवारपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होत असून या केंद्रावर दुपारी २ ते ५ या वेळेत लस दिली जाणार आहे. या केंद्रावर केवळ कोविशिल्डचा दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. पहिल्या मात्रेसाठी नोंदणी करणाऱ्यांना येथे लस देण्यात येणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच अशा नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. ही सुविधा ६० वर्षांवरील नागरिकांसाठीच आहे. लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्तीच सोबत असावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

बारावीत शिकणाऱ्या राष्ट्रीय घोडेस्वार विद्यार्थिनीची ...

बारावीत शिकणाऱ्या राष्ट्रीय घोडेस्वार विद्यार्थिनीची पुण्यात आत्महत्या
राष्ट्रीय स्तरावर घोडेस्वार ठरलेल्या एका मुलीने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. ...

विद्युत वाहिन्यांची देखभाल ड्रोन कॅमेरामुळे अधिक प्रभावी – ...

विद्युत वाहिन्यांची देखभाल ड्रोन कॅमेरामुळे अधिक प्रभावी – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीमध्ये झाले प्रात्यक्षिक
विद्युत वाहिन्यांची देखभाल व निगराणी ड्रोन कॅमेरामुळे अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास ...

‘एमपीएससी’ची पदे भरण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय जारी

‘एमपीएससी’ची पदे भरण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय जारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त ...

काँग्रेस गाजावाजा करत नाही, प्रत्यक्ष मदत करते – नाना पटोले

काँग्रेस गाजावाजा करत नाही, प्रत्यक्ष मदत करते – नाना पटोले
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या नुकसानाची ...

शिवसेना गुंडांचा पक्ष :आ.गिरीश महाजन यांची बोचरी टीका

शिवसेना गुंडांचा पक्ष :आ.गिरीश महाजन यांची बोचरी टीका
शिवसेना गुंडांचे समर्थन करणारा पक्ष असून शिवसेनेत गुंड असल्याचे खा.संजय राऊत यांनी मान्य ...