बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: सोमवार, 3 मे 2021 (11:49 IST)

WhatsApp वर शोधता येतील कोरोना लसीकरण केंद्र, कशा प्रकारे जाणून घ्या

भारतात आता WhatsApp वापरुन जवळीक वॅक्सीनेशन सेंटर शोधता येईल. यासाठी MyGov Corona Helpdesk ची मदत घ्यावी लागेल. MyGovIndia ने ट्विटरवर याची घोषणा केली आहे.
 
WhatsApp वर लसीकरण केंद्र शोधण्यासाठी केवळ आपल्याला चॅटमध्ये 'Namaste' लिहून 9013151515 यावर व्हॉट्सअॅप करावं लागेल. यासाठी स्पेशल चॅटबोट तयार करण्यात आले आहे. चॅटबोटकडून आपल्याला ऑटोमेटेड मेसेज सेंड केला जाईल.
 
चॅटबोटच्या ऑटोमेटेड मेसेजच्या उत्तरदाखल आपल्याला आपल्या क्षेत्राचं पिनकोड पाठवावं लागेल. हे सहा अंकी पिनकोड तेथे टाइप करा जेथून आपल्याला वॅक्सीन घ्यावयाचे असेल. यानंतर आपल्याला जवळीक सर्व वॅक्सीनेशन सेंटर्सबद्दल सां‍गण्यात येईल.
 
वॅक्सीनेशन सेंटरव्यतिरिक्त MyGovIndia चॅटबोटच्या मदतीने आपल्याला Covid-19 वॅक्सीन रजिस्ट्रेशनसाठी Cowin वेबसाइटची लिंक देण्यात येईल. 1 मे पासून देशात 18 वयापेक्षा अधिक नागरिकांच्या वॅक्सीनेशनची घोषणा केली गेली आहे.
 
कोरोना लसीकरणासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. यासाठी Cowin च्या वेबसाइट, Aarogya Setu अॅप किंवा कोविड सर्व्हिस पोर्टल Umang द्वारे रजिस्ट्रेशन करता येईल. हेल्प डेस्क हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत उपलब्ध आहे.
 
तथापि डिफॉल्ट भाषा इंग्रजी आहे. याला हिंदीत परिवर्तित करण्यासाठी आपल्याला Hindi किंवा हिंदी लिहून पाठवावं लागेल. उल्लेखनीय आहे की सरकारकडून कोरोना व्हायरसवर व्हॉट्स चॅटबोट सर्व्हिस मागील वर्षी मार्चमध्ये लांच करण्यात आली होती. हे व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी मोफत आहे. यावर कोरोनाशी निगडित माहिती मिळते.