शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (09:35 IST)

दिलासा : ११ खासगी रुग्णालयांकडून तब्बल ३२ लाख रुपये रुग्णांना परत

नवी मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयांना चांगलाच दणका दिला आहे. नवी मुंबईतील ११ खासगी रुग्णालयांकडून तब्बल ३२ लाख रुपये रुग्णांना परत करण्यात आलेत. 
 
नवी मुंबई मनपाने खासगी रुग्णालयांच्या वाढीव बिलांच्या तक्रार निवारणासाठी विशेष कक्षाची स्थापना केली होती. या माध्यमातून आलेल्या तक्रारींची चौकशी केली असता, ११ खासगी रुग्णालयांमार्फत रुग्णांकडून जादा बिल आकारल्याचे निदर्शनास आले होते. तर एकाच रुग्णालयामार्फत वारंवार ज्यादा बिल आकारल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेतही मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेत.
 
नवी मुंबई पालिकेने विशेष लेखा परीक्षण पथक स्थापन केले आहे. हे पथक पुढील सात दिवसात कोविड-१९ काळातील सर्व बिलांची तपासणी करणार आहे. ज्यादा आकारलेले बिल रुग्णांना परत करणार आहेत. ज्यादा बिल आकारणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे इशारा पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे.