शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (18:47 IST)

पाळणाघरात १६ महिन्याच्या बाळाला मारहाण

नवी मुंबईतील वाशी शहरात असलेल्या पाळणाघरात घडलेला क्रूर प्रकार सीसीटीव्ही व्हिडीओ कैद झाला आहे. यात पाळणाघरातील महिला कर्मचाऱ्याने चिमुरड्याला मारहाण केल्याचे दिसून येत आहे. वाशीतील स्मार्ट टॉट्स डे केअर सेंटरमध्ये ही घटना घडली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी वाशी पोलीसमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे
 
सीसीटीव्ही फुटेजनुसार १६ महिन्याचा चिमुकला एका खुर्चीवर बसला आहे. तेवढ्यात एक महिला टेबलावर त्याच्या समोर जेवणाचे ताट ठेवते आणि बाळ त्या ताटातील चमचा घ्यायल जातो, त्यामुळे महिला ते ताट थोडं पूढं सरकवते. बाळ तरीही चमचा घेण्यासाठी पुढं जातं आणि त्याचवेळी त्याच्या जोरदार थोबाडीत बसते आणि त्याला उचलून बाजूला केले जाते.  
 
बाळ रडू लागतो नंतर घरी आल्यावरदेखील बाळाचे रडणे थांबत नसल्याने सीसीटीव्ही तपासणी केल्यावर हा प्रकार समोर आला. दोन आठवड्यापासून हे बाळ रात्री झोपत नाही. सतत रडत असल्याने या बाळाला असेच मारले जात असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केली आहे.