रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 6 जानेवारी 2021 (10:18 IST)

मॉडेलिंग करणाऱ्या तरुणावर चार जणांनी केला सामूहिक अत्याचार

मॉडेलिंग करणाऱ्या गुजरातमधील एका १९ वर्षीय तरुणावर ठाण्यात चार जणांनी सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. तसेच दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
 
गुजरातमध्ये राहणारा १९ वर्षांचा पीडित तरुण हा मॉडल आहे. त्याचे काही नातेवाईक ठाणे येथे राहण्यास असल्याने तो अधूनमधून त्यांना भेटण्यासाठी येत असतो. या पीडित तरुणाचे फेसबुकवरील काही मित्र ठाण्यात राहणारे आहेत. याच मित्रांपैकी पुनीत शुक्ला (२६) याला पीडित तरुण ठाण्यात आल्याचे कळले. त्याने रविवारी रात्री पीडित तरुणाला भेटण्यासाठी साठे नगर येथील अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या एका कंपनीजवळ बोलावले. पीडित तरुण त्या ठिकाणी आला असता पुनीत आणि त्याच्यासोबत आलेल्या एका तरुणाने पीडिताला बंद पडलेल्या कंपनीच्या गच्चीवर नेले.
 
त्याठिकाणी काही वेळातच आणखी दोन तरुण आले. त्यांनी पीडित तरुणाला बांबूने मारहाण करून त्याच्यावर तिघांनी अनैसर्गिक सामूहिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार पुनीतने आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केला. या चौघांनी पीडित तरुणाला आणखी मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल फोन आणि ६ हजार रुपयांची रोकड लुटली. तसेच याबाबत पोलिसात तक्रार केल्यास व्हिडिओ फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन चौघेही तेथून पसार झाले.