मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 6 जानेवारी 2021 (10:05 IST)

विचित्रपणा, सापाच्या डोक्याला वापरलेला कंडोम घातला

मुंबईतील कांदवली पूर्वेतील परिसरात एका सापाच्या डोक्याला वापरलेला कंडोम घातल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सापाचा जगण्यासाठी संघर्ष सुरु होता. त्या सापाला श्वासोश्वास घेता येत नव्हता. ही घटना काही लोकांनी पाहिल्यानंतर लगेचच त्यांनी प्राणीमित्र मिता मालवणकर यांना बोलावून घेतले. त्यांनी त्या सापाला घातलेला कंडोम काढून टाकले आणि त्या लगेचच सापाला पशू वैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेल्या. सापावर तेथे उपचार करण्यात आले.
 
सर्प पकडण्यामध्ये प्रशिक्षित असलेल्या व्यक्तीने किंवा तज्ज्ञाने हे क्रूर कृत्य केले असल्याचा संशय मिता मालवणकर यांनी व्यक्त केला आहे. त्या सापाला कंडोम घातल्यामुळे व्यवस्थित सरपटताही येत नव्हते. त्याला पुढेही जाता येत नव्हते. गुदमरलेल्या अवस्थेत त्याचा संघर्ष सुरु होता.