मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 6 जानेवारी 2021 (08:30 IST)

एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांची आयुक्तांविरोधात घोषणाबाजी

/mns
वसईत परिवहन सेवेच्या उद्घाटनासाठी आलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी  कार्यकर्त्यांना बेदम चोप देत बाहेर काढले.
 
या घटनेत  कार्यक्रम सुरू असताना प्रेक्षकांत बसलेल्या दोन मनसे कार्यकर्त्यांनी अचानक उठून आयुक्त गंगाथरन डी. यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. आयुक्त मनसे कार्यकर्त्यांना भेटत नसल्याने मनसेच्या आयुक्तांवर राग होता. त्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी या आंदोलनाची रणनिती आखली होती. ‘आयुक्त साहेब वेळ द्या’ अशी घोषणाबाजी मनसे कार्यकर्त्यांनी केली. या अनपेक्षित प्रकाराने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ धाव घेत या दोन्ही कार्यकर्त्यांना चोप देत बाहेर नेले. या नंतर पुढील कार्यक्रम पार पडला.