1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जानेवारी 2021 (08:35 IST)

राज्यातील पावसाळी स्थिती ८ जानेवारीपर्यंत कायम राहणार

कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्यांच्या चक्रीय स्थितीमुळे गुलाबी थंडीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत हवामानाची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.  राज्यात ‘हिवाळी पावसाळा’ अवतरला आहे. मुंबईसह कोकण विभागात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील पावसाळी स्थिती ८ जानेवारीपर्यंत कायम राहणार असून, यादरम्यान राज्यात सर्वच विभागांत पावसाची शक्यता आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ५ आणि ६ जानेवारीला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ७ जानेवारीला कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. या दिवशीही या विभागांत विजांच्या कडकडाटाचा इशारा आहे. ८ जानेवारीलाही राज्यात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.