1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जानेवारी 2021 (08:43 IST)

राज्यात २ हजार ७६५ नवे कोरोनाबाधित आढळले

2 thousand 765 new corona
राज्यात सोमवारी १० हजार ३६२ जणांनी कोरोनावर मात केली. तर, २ हजार ७६५ नवे कोरोनाबाधित आढळले. आतापर्यंत राज्यात १८ लाख ४७ हजार ३६१ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यात एकीकडे दररोज कोरोनाचे नवे रुग्ण वाढत असताना, दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ४७ हजार ११ झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९४.८८ टक्के आहे.
 
राज्यात कोरोनामुळे २९ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात एकूण ४९ हजार ६९५ जण करोनामुळे दगावले आहेत. तर, सद्यस्थितीस राज्यात ४८ हजार ८०१ अॅक्टिव्ह केसेस आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३०,४,८७६ नमुन्यांपैकी १९ लाख ४७ हजार ११ (१४.९७ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४१ हजार ७२८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ३ हजार ७८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.