मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जानेवारी 2021 (08:26 IST)

सरपंचपदाच्या लिलावांबाबत चौकशी करा, राज्य निवडणूक आयुक्तांचे आदेश

राज्यात काही ग्रामपंचायतींमध्ये संरपंचपदासाठी लिलाव झाल्याची बाब समोर आली आहे. याची गंभीर दखल राज्याच्या निवडणूक आयोगाने घेतली आहे. सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी हे आदेश दिले आहेत
 
आपल्या जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या घटना घडल्या असल्यास त्यांची सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करावा, असे स्पष्ट आदेश यू. पी. एस. मदान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हा अहवाल बिनविरोध विजयी होणाऱ्या उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यासाठी 23 डिसेंबर 2004 च्या आदेशानुसार आयोगाकडे परवानगी मागतानाच सादर करावा, असं म्हटलं आहे.