शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (17:08 IST)

बाप्परे, २५० बड्या ग्राहकांकडे ६ कोटीची वीज बिले थकीत

electricity bill
दोन महिन्यांपूर्वी, टोरेंट पॉवर (टीपीएल) ने एका प्रेस नोटद्वारे प्रसिद्ध केले होते की शिळ-मुंब्रा-कळवा (एसएमके ) फ्रँचायझी क्षेत्रातील सुमारे ५०० बड्या लोकांकडे १० कोटींची वीज थकबाकी आहे. या ५०० पैकी सुमारे २५० जण पुढे आले असून त्यांनी थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे; तथापि, टीपीएल द्वारे नियमित पाठपुरावा आणि स्मरणपत्रे देऊनही, सुमारे २५० ग्राहक अद्याप त्यांची थकबाकी भरण्यासाठी आलेले नाहीत. या २५० ग्राहकांची एकत्रित थकबाकी सुमारे ६ कोटी आहे.
 
टीपीएलने पुन्हा प्रेस नोटद्वारे कळवले आहे की हे लोक; यापैकी बहुतेक बड्या लोकांना विनंती केली जात आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांची वीज थकबाकी भरावी, असे न केल्यास आता या २५० ग्राहकांवर टीपीएल द्वारे नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल. त्यांची नावेही सार्वजनिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एसएमके फ्रँचायझी क्षेत्रातील टीपीएल ची एकूण थकबाकी सुमारे रु. १४५ कोटी वर पोहोचली आहे. यामुळे टीपीएल कठोर वसुली मोहीम सुरू करणार असून, बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्यासारख्या गैरसोयीला सामोरे जावे लागू नये, यासाठी टीपीएलने ग्राहकांना त्यांची वीज देयके वेळेवर भरण्याचे आवाहन केले आहे.