गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2022 (13:12 IST)

पार्किंगमध्ये खेळणाऱ्या 5 वर्षीय मुलीवर लिफ्टमध्ये बलात्कार

rape
ठाणे- वातानुकूलित यंत्र (एसी) दुरुस्ती करणार्‍याने एका इमारतीच्या लिफ्टमध्ये 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 
तळोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी सांगितले की 19 वर्षीय आरोपी इमारतीतील एसी दुरुस्त करून पायऱ्यांवरून खाली येत असताना त्याला पार्किंगमध्ये पाच वर्षांची मुलगी खेळताना दिसली. त्याने मुलीला लिफ्टमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
 
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार पीडित मुलगी त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर तिच्या घरी पोहोचली आणि तिला उलट्या होऊ लागल्या. आईने विचारल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर आई खाली आल्यावर तिथे आरोपी सापडला. आरोपीला सुरक्षा कर्मचारी आणि इमारतीतील इतर रहिवाशांनी धरुन ठेवले होते. लोकांनी आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले.
 
पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला.