शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (11:14 IST)

मुंबईत धावत्या ट्रेनमधून पडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबईच्या गर्दीत धावत्या लोकल ट्रेन मधून पडून एका 22 वर्षीय तरुणाचा दुर्देवी अंत झाल्याची घटना आज बुधवारी घडली आहे. हा अपघात गोरेगाव ते मालाड स्थानका दरम्यान झाला आहे. 
 
मुबंईत सकाळी लोकल पकडण्यासाठी नोकरदार वर्गाची तसेच विद्यार्थ्यांची गर्दी असते. आज सकाळी देखील चर्चगेटच्या दिशेने जात सलेल्या लोकल ट्रेनला प्रचंड गर्दी होती. 22 वर्षाचा हा तरुण लोकलच्या दारावर उभारला असता गोरेगाव ते मालाड स्थानका दरम्यान त्याला प्रवाशांचा धक्का लागला आणि तो धावत्या ट्रेनच्या खाली पडला .त्याला पडलेलं  पाहून प्रवाशांनी आरडाओरडा करत लोकल थांबविली आणि तरुणाला वाचविण्याचा  प्रयत्न केला. परंतु त्याचा मृत्यू झाला होता. बोरिवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी  पोहोचून अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास करत आहे.