सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 21 मार्च 2022 (15:33 IST)

लावणी सम्राज्ञी विजया पालव यांच्यावर हल्ला

मुंबई  महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विजया पालव यांच्यावर दिव्यात जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

या हल्ल्यात विजया रक्तबंबाळ झाल्या आहेत. संबंधित घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान, विजया यांच्यावर हल्ला नेमका कुणी केला आणि त्यांच्यावरील हल्ल्यामागील नेमकं कारण काय? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.पण संबंधित घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. विजया पालव यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रीची भूमिका देखील साकारली आहे.

राहत्या इमारतीचा वाढवलेला मेंटेनन्स आणि घरात केलेल्या अंतर्गत कामाच्या वादातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मारहाणीनंतर पालव यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवलं आहे. या घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना देण्यात आली असून याचा तपास केला जात आहे. संबंधित घटना रविवारी घडली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लावणीसम्राज्ञी विजया पालव ज्या इमारतीत राहतात, त्या इमारतीतील रहिवाशांकडून मेंटेनन्स जमा करण्याचं काम बिल्डर करतो. संबंधित इमारतीचा मेंटेनन्स 800 रुपये होता. पण बिल्डरने मेंटेनन्सच्या रकमेत जवळपास दुप्पट वाढ केली. त्याने 800 रुपयांवरून थेट 1500 रुपये केला होता. यामुळे संबंधित इमारतीतील रहिवासी बिल्डरवर संतापले होते. अशात मेंटेनन्सच्या रकमेत भरमसाठ वाढ केल्याने विजया पालव आपल्या काही महिला साथीदारांसह जाब विचारण्यासाठी संबंधित बिल्डरकडे गेल्या होत्या.
त्यांच्या नृत्यकलेमुळे त्यांना लावणी सम्राज्ञी, लावण्यवती, लावणी क्वीन अशा अनेक नावांनी त्या ओळखल्या जातात. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कार, बक्षिसे मिळाली आहेत.त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर आल्याने मराठी चित्रपट सृष्टीसह चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.