शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जुलै 2024 (13:20 IST)

पाच वर्षांपासून भारतात अडकलेल्या चिनी महिलेला मिळणार दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई , मुंबई उच्च न्यायालयाने दिले आदेश

भारतामध्ये 2019 पासून एक चिनी महिलेला दहा लाख रुपये देण्याची मदत आदेश दिले आहे. ही रक्कम केंद्र सरकार देईन असे सांगण्यात आले आहे. हायकोर्ट म्हणाले की , ''भारत सरकारच्या आचरणामुळे'' चिनी महिलेला झालेला मानसिक त्रास, ट्रॉमा आणि अडचणी यांकरिता ही नुकसान भरपाई करण्यात देण्यात येणार आहे. सोबतच कोर्टाने इमिग्रेशन ब्युरोला महिलेला एग्जिट परमिट देण्याचे आदेश दिले आहे. जेणेकरून ती आपल्या देशात परत जाऊ शकेल.
 
मिळालेल्या माहितीनुसार या चिनी महिलेच्या फ्लाईटला दिल्ली इंटरनॅशनल एयर्पोर्टवर लँड करायचे होते. पण खराब वातावरणामुळे हे फ्लाईट मुंबई मध्ये डायवर्ट करण्यात आली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एयरपोर्ट वर लँड केल्या नंतर तिने ग्रीन चॅनल पार केले. पण तिला एग्जिट गेट वर कस्टम अधिकारींनी थांबवले. 
 
कस्टम ने विचारल्यानंतर महिलेने सांगितले की, तिला दिल्लीला जायचे होते. पण खराब वातावरणामुळे फ्लाईट डायवर्ट केली म्हणून ती मुंबई मध्ये पोहचली. पण अधिकारींनी तिला अटक केली. या महिलेजवळ अधिकारींना सोने सापडले. 
 
महिलेने कोर्टाला सांगितले की, ती हे सोने हॉंगकॉंग येथे घेऊन जात होती. ज्याचा उपयोग ज्वेलरी बनवण्यासाठी केला जाणार होता. आता पाच वर्षांनंतर कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार इमिग्रेशन ब्युरो या चिनी महिलेला एग्जिट परमिट द्यावे लागले. जेणेकरून ती आपल्या देशात परत जाईल.