मंगळवार, 17 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जुलै 2024 (11:13 IST)

महाराष्ट्रात कोसळत आहे मुसळधार पाऊस, मुंबई झाली जलमयय, परिसरात येलो अलर्ट

monsoon update
Maharashtra Weather Updates: मुंबईमध्ये पावसाचे सत्र सुरूच आहे. हवामान खात्याने सांगितले की,  येत्या दोन तीन तासांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो.या परिसरात येलो अलर्ट घोषित.
 
Mumbai Rain Forecast: सध्या मुंबईकरांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान हवामान खात्याने इशारा दिला आहे. येत्या दोन तीन तसांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो. पावसामुळे रस्ते जलमय झाले आहे.
 
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईच्या काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.  
 
या परिसरात येलो अलर्ट घोषित 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. यासोबतच कोकण मधील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. तर पश्चिमी महाराष्ट्रामधील पुणे आणि सतारा मध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. 
 
तर येलो अलर्ट नाशिक आणि पालघर जिल्ह्यामध्ये आहे. यासोबतच सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरसाठी   येलो अलर्ट जारी घोषित केला आहे. तसेच, आज विदर्भाच्या अधिकांश ठिकाणी येलो अलर्ट घोषित केला आहे.