मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 13 मे 2021 (15:55 IST)

'यासाठी' टास्क फोर्सची एक समिती गठीत करण्यात येणार

मुंबईतही म्युकोरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईतील वाढत्या म्युकोरमायकोसिस रुग्णांच्या उपचारांसाठी मंबई महापालिकेकडून स्पेशल टास्कफोर्स उभारण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी टास्क फोर्सची एक समिती गठीत करण्यात येणार आहे. शहरात १०० हून अधिक कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे नागरी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. म्युकोरमायकोसिस या बुरशीजन्य आजार झालेल्या रुग्णांवर स्थानिक पातळीवर औषधोपचार करण्याचे निर्देश रुग्णालय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महापालिकेकडून उभारण्यात येणारी टास्क फोर्स समिती म्युकोरमायकोसिस संबंधित सर्व केसेस हाताळेल व त्यावर उपचारांचा योग्य मार्ग सांगेल,असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनातून बरे झालेल्या १५१ रुग्णांनाम्युकोरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार झाला आहे. मुंबईच्या जे जे रुग्णालयात ४०, नायर रुग्णालयात ३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर केईममध्ये ३४, सायन रुग्णालयात ३२ तर कूपर रुग्णालयात ७ जणांवर म्युकोरमायकोसिसवर उपचार सुरु आहेत. म्युकोरमायकोसिस आजाराच्या उपचाराचा मार्ग ठरविण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टिम नेमली आहे. ENT तज्ञ,नेत्ररोग तज्ञ, सूक्ष्मजीव तज्ञ आणि भूलतज्ञांचा या टिममध्ये समावेश असल्याचे मुंबईचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितेल आहे. सर्व रुग्णालयांना या रोगाच फैलाव रोखण्यासाठी उपाययोजनांच्या सूचना देण्यात आल्या आहेत.