रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (10:14 IST)

ठाण्यातील खासगी रुग्णालयातील वॉर्ड बॉयने महिला रुग्णाचा केला विनयभंग

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला रुग्णाची 24वर्षीय वॉर्ड बॉयने विनयभंग केला. भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादो कुंभार यांनी मंगळवारी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये काम करणारा वॉर्ड बॉय मेहबूब असमोहम्मद आलम याला घटनेच्या काही तासांनंतर सोमवारी अटक करण्यात आली.  
 
मिळालेल्या माहितीनुसार 20 वर्षीय महिला रुग्णाच्या पोटात संसर्ग झाल्याच्या तक्रारीनंतर हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 9 सप्टेंबरला पहाटे 4वाजता आरोपी महिला रुग्णाच्या वॉर्डमध्ये घुसला आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. तिने सांगितले की, आरोपीने तिला लग्नासाठीही प्रपोज केले. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.