शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 (09:12 IST)

पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला करून आत्महत्याचा प्रयत्न, गिरगावची घटना

crime
मुंबईच्या गिरगाव परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. घरगुती वादामुळे पतीने पत्नीवर भररस्त्यात ती कामावर जात असताना वस्तराने जीवघेणा हल्ला करून स्वतःच्या मनगटाची नस ब्लेड ने कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या जीवघेणा हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने उपस्थित काही तरुणांनी आरोपी पतीला पकडल्यामुळे महिलेचा जीव वाचला. 

घटनेची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. 
आरोपीने पत्नीवर हल्ला जरून ब्लेड ने स्वतःचे मनगट कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.
सदर घटना गिरगाव परिसरातील खाडिलकर रोडवर सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. महिला पतीशी होणाऱ्या सततच्या भांडणाने कंटाळून आपल्या माहेरी गेली होती. 

तिच्या पतीने तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. रागात येत पतीने तिच्यावर ती कामाला जात असताना वस्तऱ्याने हल्ला केला या हल्ल्यात महिलेच्या मानेला आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे. नंतर पतीने स्वतःच्या मनगटाला कापले. दोघांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit