रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (13:31 IST)

माळशेज घाटात भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात,तिघांचा जागीच मृत्यू

मुरबाड तालुक्यात कल्याण मुरबाड माळशेज महामार्गावर घाटात कासार पुलाजवळ कारचा अपघात झाला. या अपघात तिघांचा  जागीच मृत्यू झाला. तर चार जखमी झाले.या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.  

रविवारी माळशेज घाटात मुरबाड माळशेज महामार्गावर कासार पुलाजवळ वेगाने येणारी ही कार रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने अनियंत्रित होऊन झाडावर जाऊन आदळली आणि अपघात झाला. या मध्ये कल्याण आणि रेवतीचे रहिवासी होते अशी माहिती समोर येत आहे. 

या अपघातात तिघे जागीच ठार झाले तर चार जण जखमी झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. 

जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहे.  
 
 
Edited by - Priya Dixit