शुक्रवार, 3 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (15:19 IST)

पालघर मध्ये मद्यधुंद व्यक्तीने कारने महिलेला धडक दिली, महिलेचा मृत्यू

A drunk man hit a woman with a car in Palghar
पालघर जिल्ह्यात मद्यधुंद अवस्थेत एका व्यक्तीने कॉलेजच्या प्राध्यापक असलेल्या एका महिलेला धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

आत्मजा कासट असे या मयत महिलेचे नाव आहे.या एका कॉलेज मध्ये प्राध्यापक होत्या आणि गुरुवारी संध्याकाळी 6:30 च्या सुमारास काम टपवून घरी जात असताना अर्नाळा सागरी पोलिस स्टेशन हद्दीत आरोपीने कारने धडक दिली.

या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही तासांनंतर त्यांचा मृत्यू झाला.  

या प्रकरणी कार चालकाला अटक केली असून तो अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचं तपासात आढळले आहे. आरोपीला भारतीय न्यायिक संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत अटक केली आहे. 
Edited By- Priya Dixit