रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 जुलै 2024 (19:00 IST)

Accident:अनंतनागमध्ये भीषण रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील आठ जणांचा जागीच मृत्यू

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील डाकसुम येथे शनिवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व लोक किश्तवाडचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब किश्तवाडहून सिंथान टॉप मार्गे मारवाहच्या दिशेने जात होते.

मृतांमध्ये पाच मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांची ओळख पटली आहे. 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, किश्तवाडहून भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती स्विफ्ट कारचे नियंत्रण सुटले आणि ती खड्ड्यात पडली. या अपघातात एकाच कुटुंबातील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By- Priya Dixit