रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 20 जुलै 2024 (18:02 IST)

मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक आणि टेम्पोची धडक होऊन अपघातात चालकाचा होरपळून मृत्यू

मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक आणि कोंबडीने भरलेल्या टेम्पोची धडक झाली आणि कोंबडीने भरलेल्या टेम्पोने पेट घेतला. या आगींमध्ये टेम्पोचालक जिवंत होरपळला.सदर घटना खोपोलीतील बोरघाट येथे पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. 

कोंबडीने भरलेला ट्रक मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक ला जाऊन धडकला आणि त्याने पेट घेतला. या ट्रक मध्ये अडकून चालकाचा होरपळून मृत्यू झाला. 

पोलिसांनी अपघाताची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले आणि चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांनी गॅस कटर ने टेम्पोचे लोखंडी पत्रे कापावे लागले. 

कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाला डुलकी आल्याने हा अपघात घडावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. 
या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. 
पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. 
 
Edited by - Priya Dixit