गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2024 (09:44 IST)

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ कंटेनर अपघातानंतर आग;एकाचा मृत्यू

मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास एक भरधाव कंटेनरची धडक होऊन अपघात झाला त्यात एकाचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. अपघातांनंतर आग लागून अपघातग्रस्त कंटेनर जळून खाक झाला.अपघातात विकीकुमार कुलदेव यादव राहणार बिहार याचा जागीच मृत्यू झाला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरवाडी ते औंढे  खुर्द दरम्यान बोगद्याचे व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या ठिकाणी द्रुतगती मार्ग व सेवा ट्रस्टमध्ये सुरक्षा पत्रे व रेलिंग बसवण्याचे काम व वेल्डिंगचे काम रात्री सुरु होते. 
8 वाजेच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने वेगात धावणारा कंटेनरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले

आणि तो कामाच्या ठिकाणी जाऊन धडकला. या मध्ये विकीकुमार कुलदेव यादवचा दुर्देवी मृत्यू झाला. तर चार जन जखमी झाले. काही कामगार वेगाने येणाऱ्या कंटेनरला पाहून तिथून पळून गेले. या मुळे मोठा अनर्थ टळला.
अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळतातच लोणावळा ग्रामीण पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघाताची व आग लागल्याची माहिती 

देवदूत यंत्रणा, आयआरबी पथक, लोणावळा नगरपरिषद अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पोलीस अपघाताचा तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit