शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 19 मे 2024 (13:08 IST)

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

explosion of gas tanker
चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये एका गॅसच्या कंटेनर मधून घरगुती आणि कमर्शिअल टाक्यांमध्ये गॅस चोरी करताना तीन ते चार टाक्या फुटून स्फोट झाला आणि आग लागली. सुदैवाने या अपघातात कोंगतीही जीवितहानी झाली नाही. 
 
सदर घटना चाकण शिक्रापूर मार्गावर शेल पिंपळगावात आज पहाटे पावणे पाच च्या सुमारास घडली आहे.  2 अग्निबंबाच्या मदतीने आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले असून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे तिथून पसार झाले आहे. 

सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या स्फोटामुळे तिथे असलेल्या ढाब्यासह पार्क केलेल्या वाहनांना आग  लागली. स्फोटामुळे जवळपासच्या काही घरांचे नुकसान झाले आहे. 
 
टँकर मधून गॅस वाहतुक करणाऱ्या कंटेनरला आग लागल्यानंतर प्रचंड स्फोट होऊन लगतच्या 3 ते 4 कंटेनरचे आणि परिसरातील घरांच्या भिंती कोसळून खूप मोठे नुकसान झाले आहे.आरोपी मात्र पसार झाले असून त्याचा शोध घेणं सुरु आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit