गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शनिवार, 20 जुलै 2024 (16:16 IST)

मुंबई : रहिवासी इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला, 1 महिला ठार 3 जण जखमी

building collapse
मुंबईतील ग्रँट रोड परिसरात शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एका जुन्या इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळून अपघात झाला आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहे.
या अपघातानंतर ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या इमारतीला म्हाडानं आधीच नोटिस बजावलेली होती अशी माहितीही समोर येत आहे. त्यामुळं या अपघातानंतर मुंबईतील जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
रुबिन्निसा मंझिल नावाची ही चार मजली इमारत आहे. ग्रँट रोड रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या या इमारतीचा काही भाग कोसळला आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीच्या स्लॅबचा भाग कोसळल्यामुळं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
 
इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अपघातानंतर जवळपास 7-8 रहिवासी अडकल्याची माहितीदेखिल मिळाली आहे. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून याठिकाणी मदतकार्य करण्याचं काम केलं जात आहे.
 
बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने चार जण जखमी झाले,” अधिकारी म्हणाला. त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, तेथे महिलेला मृत घोषित करण्यात आले, तर इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाची (म्हाडा) जुनी इमारत आहे, जी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) धोकादायक घोषित केली आहे. या इमारतीला यापूर्वीही नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर सात जणांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.


Published By- Priya Dixit