गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 30 जुलै 2024 (15:28 IST)

महाराष्ट्रातील ठाण्यात एका व्यक्तीने आपल्या सावत्र मुलाची केली हत्या

murder
महाराष्ट्रातील ठाणे शहरामध्ये आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केली म्हणून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली. मुलाच्या आईने पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर आरोपीशी लग्न केले होते. लग्नानंतर महिला आपल्या मुलाला कोलकाताहून घेऊन आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या दुसऱ्या पतीला मागील लग्नापासून तिच्या मुलाबद्दल माहिती नव्हती.
 
तसेच सावत्र मुलाची माहिती मिळाल्यानंतर आरोपी आणि महिलेमध्ये वाद सुरू झाला. आरोपी आपल्या सावत्र मुलावर खूश नव्हता. त्याने मुलाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. व रागाच्या भरात मुलाची हत्या केली आहे. चिमुकल्याच्या हत्येनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोस्टमोर्टम रिपोर्टनुसार  मुलाचा अनेकवेळा शारीरिक छळ करण्यात आला. तसेच मुलाच्या बरगड्या आणि हाडेही तुटल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. व पुढील तपास करीत आहे.