बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (22:41 IST)

मुंबईत 24 मजली इमारतीच्या टेरेस वर जाऊन अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली

suicide
मुंबईत 24 मजल्याच्या इमारतीच्या टेरेस वर जाऊन गळफास घेऊन 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली आहे.रिया वैभव ठाकूर असे या 15 वर्षीय अल्पवयीन मयत मुलीचे नाव आहे.  
मयत रिया प्रभादेवीच्या कामगार नगर सेंच्युरी म्हाडा इमारतीत आपल्या पालकांसह राहत होती. शनिवारी सकाळी 10:15 च्या सुमारास रिया टेरेस वर गेली आणि रियाने ओढणीचा गळफास लावून आत्महत्या केली. तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि मृतदेह रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.