रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (22:18 IST)

यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी जवळपास पाच लाखांवर लोक जमा करण्याची जबाबदारी

शिवसेना नेमकी कोणाची याचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठी तयारी करत आहेत. यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी जवळपास पाच लाखांवर लोक जमा करण्याची जबाबदारी त्यांनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांवर सोपविली आहे.
 
यामुळे राज्यभरातून १० हजार बसेस मुंबईत येण्याची शक्यता आहे. विशेष ट्रेन देखील बुक करण्यात येत आहेत. राज्यभरातील चाळीस आमदार आपलेच दोन ते तीन हजार कार्यकर्ते गोळा करणार आहेत. याशिवाय जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी टार्गेट देण्यात आली आहेत.  
 
जळगावमध्ये तीन ट्रेन बुक करण्यात आल्या आहेत. यासाठी आगाऊ दोन लाख रुपये प्रत्येक ट्रेनसाठी दिले आहेत. तसेच नाशिकमध्ये देखील शिवसेनेची बैठक सुरु आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या सभेची गर्दी नाही तर जनसंघाच्या सभेच्या गर्दीचा विक्रम मोडण्याची तयारी सुरु आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्य़कर्ते मुंबईत येणार असल्याने त्यांच्या राहण्याच्या, जेवण्याच्या सोईसाठी मुंबईतील मोठमोठे हॉल, हॉटेल बुक केली जात आहेत. त्यांच्या मदतीसाठी कार्यकर्ते तयार केले जात आहेत. एवढ्या लोकांचे नियोजन करण्यासाठी खास लोकांवर शिंदे यांनी जबाबदारी सोपविली आहे.