शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (21:04 IST)

आता शिवसेना गटप्रमुखांचा 21 सप्टेंबरला गोरेगावात

uddhav thackeray
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडल्यापासून नवनव्या चेहऱ्यांना पक्षात प्रवेश दिला आहे.संभाजी ब्रिगेडसोबत  युतीचा निर्णय देखील उद्धव ठाकरेंनी घेतला.अमित शाह यांनी काल केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी आज सूचक उत्तर दिलं आहे. ते शिवसेनेला संपवायला निघालेले आहेत,आता संघर्षाचा काळ आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आता शिवसेना गटप्रमुखांचा 21 सप्टेंबरला गोरेगावातील नेस्को इथं मेळावा होणार आहे. त्या मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिंदे गट यांच्याकडून त्यांनी केलेल्या टीकेला जाहीरपणे प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला महत्व प्राप्त झालं आहे
 
दसरा मेळाव शिवतीर्थावर?
दरम्यान, दसरा मेळावा शिवाजी पार्कातच  घेण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. शिवसेनेचं शिष्टमंडळ मुंबईच्या जी नॉर्थ वॉर्डच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे. सगळ्यात आधी अर्ज दिल्यानंतरही परवानगी अजून दिलेली नाहीये. याबाबत विचारणा करण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.  शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार असा विश्वास माजी महापौर किशोरी पेडणेकर  यांनी व्यक्त केलाय.