गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जुलै 2024 (18:40 IST)

ठाण्यात चोर असल्याच्या संशयावरून तरुणाची मारहाण करून हत्या, आरोपींना अटक

death
ठाण्यात चोर असल्याच्या संशयावरून एका तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केली नंतर त्याचा मृत्यू झाल्यावर मृतदेह झुडपात फेकण्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात 24 जुलै रोजी ठाण्यातील दिवा परिसरात झुडपात मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली.  पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर तरुणाला जबर मारहाण केल्याचे आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालात जबर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी खुनाचा शोध लावणे सुरु केले. 

तपास करताना पोलिसांना कळाले की, गेल्या बुधवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास हा तरुण मुंब्य्रातील एका कार वॉशिंग सर्व्हिस सेंटरच्या जवळ आला. तिथे उपस्थित असलेल्या चौघांनी त्याला चोर असल्याचे समजून जबर मारहाण केली. तो त्यांना सोडण्यासाठी विनवणी करत असताना त्यांनी त्याला मारहाण करणे सुरु ठेवले.

आरोपींनी त्याला बळजबरी एका ऑटोरिक्षात बसवले आणि मारहाण केली. त्यात तरुणाचा मृत्यू झाला. नंतर आरोपींनी मृतदेह झुडुपात फेकून दिले आणि पसार झाले.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यावर पुरावे गोळा केले आणि आरोपींना शोधले आणि ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 
Edited By- Priya Dixit