महाराष्ट्रात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार,आरोपीला अटक
15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातून समोर आली आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी शिर्डीहून परत येत असताना आरोपींनी तिला पकडले आणि तिला रेल्वे परिसरातून दूर असलेल्या रेल्वे निवासस्थानी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलीला बलात्काराची ही तक्रार दाखल करण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याचे कारण असे की,दोन पोलीस ठाण्यांनी मुलीची तक्रार लिहायला नकार दिला.
ते म्हणाले की, हे प्रकरण त्यांच्या पोलीस ठाण्याचे नाही, त्यामुळे त्यांनी तक्रार लिहिण्यास नकार दिला. उल्हासनगर स्टेशन परिसरातील रेल्वे निवासस्थानी बलात्काराची घटना शुक्रवारी रात्री घडली.मात्र,आता आरोपीला अटक करण्यात आली आहे.आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे पोलीस आयुक्त यांनी माध्यमांना सांगितले की, 15 वर्षीय मुलगी शिर्डीहून परत येत होती. ती भिवंडी बायपासवर उतरली, नंतर कल्याणला गेली आणि उल्हासनगरसाठी लोकल ट्रेनमध्ये चढली. रात्री नऊच्या सुमारास बाहेर पडल्यानंतर ती तिच्या दोन मित्रांना भेटली आणि ते घराच्या दिशेने चालत गेले. ते स्टेशनवरील स्कायवॉकवर चालत असताना आरोपी त्यांच्याजवळ आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीच्या मित्रांना त्याच्याकडे असंलेल्या हातोडीने धमकावले. त्याने कथितपणे तिचे अपहरण केले आणि तिला स्कायवॉकपासून सुमारे 50 मीटर अंतरावर एका निर्जन रेल्वे निवासस्थानी नेले. तेथे आरोपींनी कथितपणे 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिच्यावर मारहाण केली. ती मुलगी रात्रभर तिथेच पडून होती.
सकाळी ती पळून जाण्यात यशस्वी झाली आणि एका प्रवाशाचा फोन उधार घेतला आणि तिच्या मित्राला फोन केला, ज्याने तिला जवळच्या पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला.रेल्वे पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पोलीस ठाण्यांनी मुलीच्या तक्रारीची नोंद घेण्यास नकार दिला कारण गुन्हा त्यांच्या अधिकारीक क्षेत्रात झाला नाही. त्यांची तक्रार का नोंदवली गेली नाही याची चौकशी केली जाईल असे ते म्हणाले.
आयुक्तानुसार, "आम्ही पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आहे आणि तिचे समुपदेशन केले जात आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची तपासणी केली आहे आणि तपास सुरू आहे." ते म्हणाले, "आम्ही आरोपीची पार्श्वभूमी तपासणी केली आणि असे आढळले की त्याच्याविरुद्ध ठाणे शहरात चोरीसारखे अनेक गुन्हे आहेत."