बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 12 सप्टेंबर 2021 (08:03 IST)

साकीनाका बलात्कारानंतर मुंबईला पुन्हा हादरा, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

साकीनाका बलात्कार प्रकरणामुळं महाराष्ट्र हादररेला असतानाच ठाण्याच्या उल्हासनगरमध्येही बलात्काराची एक घटना घडली आहे. याठिकाणी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचं वृत्त मिळाले आहे.
 
उल्हासनगरमधील रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकार घडला आहे. 14 वर्षांच्या या अल्पवयीन मुलीवर एका पडक्या घरात बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी श्रीकांत गायकवाड उर्फ दादा याला अटक केली आहे.