साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू; सर्व स्तरांतून संतापाची लाट
साकीनाका येथे ३२ वर्षीय महिलेवर काल झालेल्या बलात्कार घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले असून सर्व स्तरांतून संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनी कठोर शिक्षेची मागणी करुन सरकारवर जोरदार टीका केली. तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असे सांगितले आहे. या घटनेची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहले आहे. यात सर्व आरोपांनी अटक करा व पीडितेच्या कुटुंबियांना मदत करण्याचे सांगितले आहे.
या पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्य़ू झाला. या प्रकरणी आरोपीला घटनेनंतर काही तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. या घटनेत पीडित महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला.त्यानंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली.यावेळी एकाने पोलिस कक्षाला फोन करुन महिलेला मारहाण करत असल्याचा फोन केला.त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या महिलेला राजवाडी रुग्णालयात दाखल केले.येथे या महिलेचा उपचार सुरु असतांन आज मृत्यू झाला.२४ तासांहून अधिक काळ पीडितेची मृत्य़ूशी झुंज सुरु होती. पण, जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.या घटनेते पोलिसांनी भादंविच्या ३७६, ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून मोहन चौहान या आरोपीला अटक केली आहे.