बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (19:43 IST)

मुंबईत दिल्लीच्या 'निर्भया' हत्याकांडाची पुनरावृत्ती

मुंबईत एक हादरवणारी घटना घडली आहे ज्यात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कारानंतर गुप्तांगात लोखंडी रॉड टाकण्याचं अमानुष कृत्य केलं गेलं. ही संतापजनक घटना साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात घडली. 
 
या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. कारण देशाची राजधानी नवी दिल्लीत सन 2012 मध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या वेदना अजून होत असताना मुंबईत त्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. मुंबईतील ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दुसरीकडे पीडित महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. पीडितेवर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु असून ती अद्यापही बेशुद्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 
या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. विशेष म्हणजे पुण्यात आठवड्याभरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्कारासारख्या हादरवणाऱ्या तीन घटना ताज्या असताना आता राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही अशाप्ररकारची घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनाच्या कामकाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.