बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (08:21 IST)

बिल्डर आणि ‘डी गँग’चा फायनान्सर युसूफ लकडावालाचा जेलमध्ये मृत्यू

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा ऑर्थर रोड कारागृहात मृत्यू झाला आहे.लकडावालाला जे जे रुग्णालयात नेले,तेथे दाखल करण्यापूर्वी त्याला मृत घोषित करण्यात आले.युसुफ लकडावाला कॅन्सरने त्रस्त होता.एन एम जोशी मार्ग पोलिसांचे एक पथक आर्थर रोड कारागृहात असून डीआरए दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रताप भोसले यांनी दिली आहे.मनी लाँडरिंगसह पैशाच्या अफरातफरी प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती.
 
2019 मध्ये जमीन खरेदी प्रकरणी सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावाला याला (वय-76) अहमदाबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरुन  लंडनला  पळून जाण्याच्या तयारीत असताना लकडावाला याला अटक करण्यात आली होती.कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा आर्थिक व्यवहार सांभाळल्याचा आरोप लकडावालावरती लावण्यात आला होता. खंडाळ्यातील हैदराबाद नवाबाच्या 50 कोटी रुपयांच्या जमीन खरेदीसाठी बनावट कागदपत्रे बनविल्याच्या आरोपाप्रकरणी युसूफ लकडावालाची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.त्यानंतर युसूफला ईडीकडूनअटक करण्यात आली.